

बायोफ्युअलसर्कल, भारताची पहिली ऑनलाइन बाजारपेठ जैवइंधने व बायोमास यांसाठी.
आम्ही कोण आहोत
आम्ही भारतात एका वर्धित आणि डिजिटल संचालन असलेल्या जैवऊर्जा पुरवठा साखळीची पायाभरणी करणारे आद्यप्रवर्तक आहोत. या क्लाउड आधारित बाजारपेठेद्वारे आम्ही जैवऊर्जा पुरवठा साखळीशी संबंधित आव्हानांवर उपाय काढण्याचा आणि शिवाय यातून अर्थव्यवस्था, समाज आणि आपल्या आसपासचे पर्यावरण यांच्यावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्याबद्दल
पुण्यात असलेल्या बायोफ्युएलसर्कल प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2020 साली झाली आणि ती स्टार्ट-अप इंडिया उपक्रमाखाली नोंदणीकृत स्टार्ट-अप आहे. बायोफ्युएलसर्कलच्या स्थापनेमागे तीव्र इच्छा आणि एक विश्वसनीय आणि कमी खर्चात चालणारी जैवऊर्जा पुरवठा साखळी तयार करणे या स्फूर्ती होत्या.
बायोफ्युएलसर्कल ही बायोमास आणि जैवइंधने यांच्यासाठी मुद्दामून रचलेली भारतातील पहिली आणि आगळीवेगळी बाजारपेठ आहे. या क्रांतिकारी कल्पनेद्वारे भारतभरातल्या जैवऊर्जा पुरवठा साखळीच्या भागीदारांसाठी एक खात्रीशीर आणि अतिशय प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म आणि एक सुसंघटित ठोस पर्यावरण निर्माण होईल. शेतातून इंधनाकडे या पर्यावरणात नव्या संधी निर्माण करून बायोफ्युएलसर्कल व्यवसायांना वाढीची संधी उपलब्ध करून देत आहे आणि त्याचबरोबर शेतातल्या कूडा कचर्यासाठी वर्तुळ अर्थव्यवस्था, ग्रामीण भागाला सक्षम बनवणे आणि कर्बवायूची निर्मिती कमी करणे हेही उद्देश साध्य करत आहे.

उद्दिष्टे
-
बायोमास आणि जैवइंधन व्यवसायांसाठी बाजारपेठेपर्यंत सुलभ प्रवेश आणि पोहोच.
-
बायोमास जैवइंधन आणि जैवउत्पादनांसाठी कार्यक्षम आणि खात्रीशीर वाहतुक व्यवस्था.
-
प्लॅटफॉर्मवरील सहभागींसाठी सुलभ वित्तपुरवठा आणि डिजिटल पेमेंट्स.
-
सहभागींसाठी बाजारपेठेवर आधरित दरनिर्धारण

व्हिजन
जैवऊर्जेसाठी खात्रीशीर पुरवठा साखळी निर्माण करणे आणि बाजारपेठेवर आधारित चैतन्यपूर्ण सहभागाद्वारे जैवऊर्जा व्यवसायात प्रमाणबद्ध वाढ होण्याला बळ देणे.

We are backed by
Co-Founder and MD, kPoint Technologies
Co-Founder Director and Board Chairman, GS Lab