top of page
we-serve-eng-mo.jpg
We Serve – 2.jpg
We Serve – 5.jpg

प्रत्येक भागीदारासाठी वृद्धी, पारदर्शकता, विश्वसनीयता, व्याप्ती, आणि व्यवसाय करण्याची सुलभता प्राप्त करण्याची संधीआमच्या डिजिटल व्यासपीठावर आहे

We Serve Page2.jpg

आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक सह्भागीसाठी विस्तार, दृष्टिमानता, विश्वासार्हता, पोहोच आणि कटकटींखेरीज व्यवसाय करण्याची सुविधा

शेतकरी

शेतातला कूडाकचरा विकता येत असेल तर तो जाळायचा कशाला?

थेट जैवऊर्जा कंपन्यांपर्यंत पोहोचा, जे यापूर्वी कधीही शक्य नव्हते. आम्ही या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक खरेदीदार आणत आहोत. अधिक मागणीमुळे तुम्हाला अधिक चांगला दर मिळू शकेल. तुम्ही कोणत्याही कटकटींशिवाय अधिकचे उत्पन्न मिळवावे अशी आमची इच्छा आहे- फक्त एकदाच नव्हे तर दर मोसमाला. या संघटित पर्यावरणामुळे बायोमासवर प्रक्रिया, साठवणुकीसाठी उपाय आणि इतर मधल्या प्रक्रियांसाठी नव्या व्यवसाय संधीसुद्धा तयार होतात.

Farmer
Rural business
Rural Businesses.png
Set 1 rework 1.jpg

ग्रामीण व्यवसाय

आम्ही ग्रामीण व्यवसाय आणि रोजगारांसाठी नव्या संधी शक्य बनवत आहोत. यात अवजारे भाड्याने देणे, दर्जा  तपासणी प्रयोगशाळांची तसेच बायोमासवर प्रक्रिया करणार्‍या कारखान्यांची उभारणी करणे आणि इतर बर्‍याच  गोष्टींचा समावेश आहे.  जसजसा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नेटवर्कचा विस्तार होत जाईल तसतशी बाजारपेठेपर्यंतची पोहोच वाढत जाईल. या प्लॅटफॉर्मवर व्यवसाय केल्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाच्या नोंदी उपलब्ध होऊन तुमच्या व्यावसायाचे पतमानांकन वाढण्यास मदत होईल.

बायोमासवर प्रक्रिया करणारे

या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केल्यावर थोड्याच काळात तुम्हाला आपला व्यवसाय वाढवण्याची तयारी सुरू करावी लागेल. पोहोच आणि उपलब्धतेतील वाढीमुळे अधिक खरेदीदारांशी संपर्क आल्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल. वाहतुकीचे नियोजन आणि वाहतुकीच्या सेवांमुळे तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच कटकटींखेरीज व्यवसाय करण्याची सुविधा उपलब्ध होईल. या प्लॅटफॉर्मवर वेळापत्रक व वाहतुक यांचे सर्वोत्तमीकरण करण्याची सुविधा अंतर्भूत आहे. या कार्यक्षमतेमुळे तुमच्या व्यवसायाची तग धरून रहण्याची क्षमता वाढेल. प्लॅटफॉर्मवर तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाच्या नोंदी उपलब्ध असल्याने तुमच्या व्यावसायाचे पतमानांकन  वाढण्यास मदत होईल.

Biomass Processors.png
Set 1 rework 4.jpg
Biomass Processor
Bioenergy company
Bioenergy Company.png
Set 1 rework 2.jpg

जैवऊर्जा कंपन्या

हा प्लॅटफॉर्म तुम्हाला अधिक खरेदीदारांपर्यंत पोचून जैवइंधन विक्री करण्यास आणि अधिक चांगल्या किमती  मिळवण्यास मदत करेल. विश्वासार्ह वाहतुक नियोजन सेवांमुळे तुमच्या बाजारपेठेच्या सीमा विस्तार पावतील. हा प्लॅटफॉर्म खरेदी आणि वाहतुकीवरील कार्यकारी खर्च कार्यक्षमतेने कमी करण्यास मदत करतो. या प्लॅटफॉर्मवर वेळापत्रक व वाहतुक यांचे सर्वोत्तमीकरण करण्याची सुविधा अंतर्भूत आहे. यातून व्यावसायिक भांडवलाचा कार्यक्षम उपयोग करण्यात मदत मिळते.

industry

उद्योग

हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या गरजा प्रदर्शित करण्यास, प्रस्ताव मिळण्यास आणि सर्वात  सुयोग्य पुरवठेदार निवडण्यास मदत करतो. यातून तुमच्यासाठी एक संपूर्ण नवी बाजारपेठ उपलब्ध होते. पोहोच वाढवण्यासाठी वाहतुक नियोजन केल्याने तुमची कामे सुलभतेने पार पडतात. या प्लॅटफॉर्मवर अनेक वाहतुकदार नावनोंदणी करत असल्याने तुम्हाला स्पर्धात्मक दर मिळू शकतात. गरजेनुसार वेळापत्रक आणि वाहतुकीचे नियोजन करता आल्यामुळे कामातील कार्यक्षमता वाढते.

Industry.png
Set 1 rework 5.jpg
Transporter
Transport.png
Set 1 rework 6.jpg

वाहतुक

बायोफ्युएलसर्कलचे नोंदित सेवा प्रदाते म्हणून तुम्हाला जैवऊर्जा पुरवठा साखळीतील व्यवसायांशी संपर्क साधता येतो. त्यांच्या वाहतुकीच्या गरजांमुळे लघु तसेच दीर्घ कालावधीसाठीचे वाहतुक करार करण्याच्या संधी उपलब्ध होतात. ही ऑनलाईन बाजारपेठ तुमच्यासाठी 24 / 7 व्यावसायिक  संधी उपलब्ध करून देते. विस्तारित होत असलेल्या या नेटवर्कमुळे तुमच्या व्यवसायाच्या वाढीला चालना मिळेल.

वित्त

प्राधान्यक्षम वित्तीय भागीदार म्हणून, तुम्हाला तुमचा ग्रामीण व कृषी व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते. डिजिटल व पडताळणी झालेले व्यवहार प्राप्त करा, नवीन ग्राहकांना भेटा आणि तुमच्या संस्थेसाठी व्यवसायाचे नवीन मार्ग निर्माण करा. इतर उत्पादने क्रॉस-सेल करण्याची ही संधी मिळवा. शासनाने हे जैवऊर्जा क्षेत्र अनेक पटींनी वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलेले असून हे नव्या युगातील जलद वाढणारे उद्योग क्षेत्र आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होऊन या वृद्धीचा भाग बना.

Finance.png
Set 1 rework 3.jpg
Finance company
bottom of page