top of page
Why Bioenergy – 7.jpg

ग्रामीण आणि औद्योगिक अर्थव्यवस्थांमधील दुवा बनणारी चक्रीय अर्थव्यवस्था.

तंत्रज्ञान

शेतीतला उरलेला कूडाकचरा, वाया गेलेले अन्न आणि कुठल्याही प्रकारच्या सेंद्रीय कचर्‍यात(थोडक्यात: बायोमास) ऊर्जा तयार करण्यासाठी वापरले जाण्याची क्षमता  असते. बायोमासचे रूपांतर जैवइंधनात प्रभावीपणे करता येते.  जैवइंधन तयार करताना जैवखतांसारख़ी इतर उत्पादनेसुद्धा तयार होतात.  काही अंदाजांनुसार भारतात साधारणपणे 235 मेट्रिक टन शेतीतला उरलेला कूडाकचरा तयार होतो.  या अधिकच्या उरलेल्या कूडाकचर्‍याचा 100% वापर केल्यास  देशाच्या ऊर्जा गरजेचा 17% भाग पुरवता येऊ शकतो ज्यातून शेतकर्‍यांसाठी अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग अणि ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती घडू शकते.    

bioenergy.jpg
Bioenrgy

आतील पाने, बाणांवर क्लिक करून

Economy

अर्थव्यवस्था

शेतकर्‍याने बायोमास तयार करणे आणि त्या बायोमासपासून तयार झालेल्या उत्पादनाचा वापर करणे म्हणजेच शेती- इंधन – खत हे चक्र.  यात जैवइंधने आणि खते यांचा समावेश आहे.  “शेतीतून परत शेतीत”.  कमी कर्बवायू तयार होणे आणि शेतातला कूडाकचरा जाळण्यातून होणारे प्रदूषण टळणे या दोन मुद्द्यांचा विचार करता जैवइंधन पेट्रोलला असणार्‍या सर्वोत्तम पर्यायांमध्ये मोडते.  यातूनच परदेशातून आयात केलेल्या इंधनावर अवलंबून राहणे आपल्याला कमी करता येईल.  एकदा जैवऊर्जेची पुरवठासाखळी स्थिरस्थावर झाली की ग्रामीण व शहरी भागात व्यवसायाच्या अनेक संधी उदयाला येतील.   अस्तित्वातील व्यवसायांचा विस्तार अधिक रोजगारांच्या निर्मितीला कारणीभूत ठरेल. या नवीन संकल्पनेद्वारे आपल्या अर्थव्यवस्थेला विविध लाभ होतील.

money-2724241_1920.jpg

पर्यावरण

plant-3751683_1920.png

जैवऊर्जेच्या निर्मितीमुळे पर्यवरणातल्या हवेचा दर्जा अधिक चांगला राहतो.  जैवइंधने जैविकरित्या नष्ट होणारी असतात. जैवऊर्जा तयार होताना बायोमासमधून बाहेर पडणारा कर्बवायू हा वनस्पतींनी अन्न तयार करण्यासाठी कर्बवायू शोषून घेणे आणि वनस्पती कुजणे या जीवनचक्रातून फिरणार्‍या कर्बवायूचाच एक भाग असतो.  त्यामुळे खनिज इंधनांसारखा त्यांमधून अधिकचा कर्बवायू वातावरणात सोडला जात नाही.  जैवइंधने हरित वायू बाहेर पडणे कमी करतात आणि ती शाश्वत (टिकाऊ) उर्जा स्त्रोत आहेत.  उष्णता व वीज निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो.    

सामाजिक

स्थिरस्थावर आणि बळकट पुरवठासाखळीतून ग्रामीण व शहरी भागांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होतील.  छोट्या शेतकर्‍यांपासून कारखान्यांपर्यंत रोजगाराच्या संधींमध्ये वाढ व्हायला मदत होईल.  नव्या व्यवसायांमुळे यात भरच पडेल. उत्पन्नाच्या अधिकच्या स्त्रोतामुळे अनेकांच्या राहणीमानात सुधारणा घडेल. पारदर्शक बाजारामुळे व्यापाराच्या भल्या पद्धती वापरात येतील ज्यातून सर्वांचेच हित साधले जाणारे सौदे घडतील.  यातून पारंपरिक व्यवसायांना नवा चेहरा लाभेल.          

field-5416600_1920.jpg
Environment
Social
icon4.png

स्थानिक रोजगार

icon3.png

ग्रामीण अर्थव्यवस्था

icon2.png

ऊर्जा सुरक्षितता 

icon1.jpg

हरित ऊर्जेच्या व्याप्तीमधे वृद्धी 

bottom of page